Ticker

6/recent/ticker-posts

उच्च न्यायालय याचिका - मनोज जरांगेंना मुंबई येण्यास परवानगी आहे की नाही? कोर्टातून आली मोठी बातमी, सदावर्तेंना दे धक्का!

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील लाखोंच्या संख्येनं मुंबईकडे जालन्याहून रवाना झाले आहे. आज त्यांच्या मुक्काम पुण्यात असणार आहे. पण त्यांच्या या आंदोलनाच्या विरोधात गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती. पण कोर्टातील मुळ खंडपीठाने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे.



लाखो मराठा बांधवाना घेऊन मनोज जरांगे जालन्याहून मुंबईकडे निघाले आहे. पण, त्यांना मुंबईत येण्यास परवानगी देऊ नये यासाठी गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. पण, मराठा आंदोलनाविरोधात याचिका करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांना दुसऱ्या खंडपीठाकडे दाद मागण्याचे निर्देश देण्यात आले आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनाला विरोध करत याचिका दाखल केली आहे. - मनोज जरांगेंच्या प्रस्तावित आंदोलनाविरोधातील याचिकेवर सुनावणीस हायकोर्टातील मूळ खंडपीठ नकार दिला आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठाने प्रकरण न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठाकडे सुनावणीसाठी वर्ग केलं आहे. काही कारणास्तव या याचिकेवरील सुनावणीस न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने नकार दिला आहे.

गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनांमधील गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता, त्याचबरोबर पोलिसांवरील हल्ले जाळपोळ, शासकीय मालमत्तांचे नुकसान आणि मुंबईतील व्यवसायिक आस्थापना सांकेतिक भाषेत बंद पाडू अशा विविध धमक्या देणाऱ्यांना परवानगी देण्यात येऊ नये' अशी मागणी याचिकेतून केली आहे.

दरम्यान, याआधीही मनोज जरांगे यांना मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन करण्याची परवानगी देऊ नये, याचिकेतून मागणी आरटीआय कार्यकर्ते हेमंत पाटील यांच्याकडून हायकोर्टात केली होती. पण, मुंबईत कायदा सुव्यवस्था राखणं ही जबाबदारी प्रशासनाची आहे, कोर्ट यात हस्तक्षेप करणार नाही, असं म्हणत कोर्टाने तातडीच्या सुनावणीस नकार दिला होता.

मुंबईत कुठेही आंदोलनाची परवानगी न देण्याची प्रमुख मागणी केली होती. आझाद मैदानसह, बीकेसीत आणि शिवाजी पार्क मध्येही आंदोलनाची परवानगी मुंबई पोलिसांकडे मागितल्याची माहिती आहे. मनोज जरांगे 20 जानेवारी रोजी आंतरवली सराटी येथून निघाले आहे. 26 जानेवारीपर्यंत मुंबई दाखल होणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय. जरांगेंच्या वतीनं आझाद मैदान, एमएमआरडीए आणि शिवाजी पार्क मैदानात आंदोलनाची परवानगी मागत मुंबई पोलिसांकडे अर्ज केला आहे. लाखो कार्यकर्त्यांना मुंबईत आणून कायदा सुव्यस्था बिघडवण्याची धमकी दिली जात असल्याचा आरोप ला असंच अंतरवाली सराटीत झालेल्या हिंसक आंदोलनाचाही याचिकेत उल्लेख केला होता. पण कोर्टाने याचिकेवर सुनावणीस नकार दिला आहे.


Post a Comment

0 Comments