Ticker

6/recent/ticker-posts

मनोज जरांगे पाटील भावुक, डोळ्यात पाणी; म्हणाले 'मी असेल नसेल पण... मनोज जरांगे पाटील मुंबई ला रवाना..

मनोज जरांगे पाटील भावुक, डोळ्यात पाणी; म्हणाले 'मी असेल नसेल पण... मनोज जरांगे पाटील मुंबई ला रवाना.. 

आज मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीमधून मुंबईच्या दिशेनं निघणार आहेत. त्यांनी सरकारला आरक्षणासाठी 24 डिसेंबरपर्यंतची वेळ दिली होती. मात्र आरक्षण न मिळाल्यानं त्यांनी 23 डिसेंबरला बीडमध्ये इशारा सभा घेतली होती. या सभेतून त्यांनी वीस तारखेपासून मुंबईत आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार आज या आंदोलनाला सुरुवात होणार आहे. या आंदोलनाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. अंतरवाली सराटीमधून निघण्यापूर्वीच मनोज जरांगे भावुक झाल्याचं पाहायला मिळालं त्यांच्या डोळ्यात पाणी आलं.. तब्येत उपोषणाला साथ देत नाही, मी असेल नसेल माहित नाही पण मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, लेकरांच्या अंगावर गुलाल उधळला गेला पाहिजे असं त्यांनी म्हटलं आहे.



त्यासोबतच त्यांनी या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाज बांधवांना देखील काही सूचना केल्या आहेत. मराठा समाजाची एकजूट तूटू देऊ नका, सात महिने आम्ही सरकारला वेळ दिला मात्र आरक्षण मिळालं नाही. आता ही आरक्षणाची शेवटची लढाई आहे. शेवटची लढाई आरपारची आहे. कोणी कोणाची वाट पाहू नका, मुंबईत मराठ्यांचा कोटींचा आकडा दिसेल. आंदोलन शांततेतच होईल, पायी मोर्चा शांततेच काढा, उद्रेक करणाऱ्यांना पोलिसांच्या ताब्यात द्या. अंतरवालीमधूनच अमरण उपोषण करत मुंबईकडे जाण्याचा विचार आहे, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

Post a Comment

0 Comments