मनोज जारंगे पाटील यांचं आंदोलन शांत करण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राज्य सरकारला आलं असलं तरीही सत्ताधाऱ्यांमध्ये यावरून मतभेद असल्याचं स्पष्ट झालं आहे. मात्र आता मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणावरून छगन भुजबळ पाठोपाठ भाजपचे नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नाराजी व्यक्त करत असहमती दर्शवली आहे. तशा स्वरूपाची पोस्ट त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केली आहे. राज्य सरकारच्या मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेला नारायण राणे यांनी विरोध दर्शविला आहे.
काय म्हणाले नारायण राणे पहा.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजपत्र काढून मनोज जरांगे पाटील यांना मोठा दिलासा दिला आहे. यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ट्विट करुन आपली भावना व्यक्त केली.
मराठा समाज आरक्षणासंबंधी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाशी आणि दिलेल्या आश्वासनाशी मी सहमत नाही. यामध्ये ऐतिहासिक परंपरा असलेल्या मराठा समाजाचे खच्चीकरण आणि इतर मागास समाजावर अतिक्रमण होणार असल्याने राज्यात असंतोष निर्माण होऊ शकतो. उद्या सोमवार दि. २९ जानेवारी रोजी मी यावर पत्रकार परिषद घेऊन सविस्तर बोलेन असं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी स्पष्ट केलं आहे.
नारायण राणे on Twitter
मराठा समाज आरक्षणासंबंधी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाशी आणि दिलेल्या आश्वासनाशी मी सहमत नाही. यामध्ये ऐतिहासिक परंपरा असलेल्या मराठा समाजाचे खच्चीकरण आणि इतर मागास समाजावर अतिक्रमण होणार असल्याने राज्यात असंतोष निर्माण होऊ शकतो. उद्या सोमवार दि. 29 जानेवारी रोजी मी…
— Narayan Rane (@MeNarayanRane) January 28, 2024
आता 29 जानेवारी रोजी नारायण राणे कोणती भूमिका मांडतात याकडे लक्ष द्यावे लागेल.
0 Comments