Ticker

6/recent/ticker-posts

झॉम्बी विषाणूमुळे करोनापेक्षा मोठं संकट येणार? शास्त्रज्ञांकडून धोक्याचा इशारा, चिंता वाढली

करोनामुळे झालेली जीविहानी ताजी असताना, लॉकडाऊनच्या कटू आठवणी ताज्या असताना आता शास्त्रज्ञांनी एका नव्या विषाणूबद्दल धोक्याचा इशारा दिला आहे. आर्टिक आणि अन्य ठिकाणी बर्फाखाली दडलेले विषाणू जगभरात धुमाकूळ घालू शकतात. झॉम्बी विषाणूमुळे करोनापेक्षा मोठं संकट येणार? शास्त्रज्ञांकडून धोक्याचा इशारा. द गार्डियननं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

health,zombai virus, 



जागतिक तापमानवाढीमुळे आर्टिक परिसरातील बर्फ वितळत आहे. बर्फाखाली असलेले विषाणू बाहेर आल्यास जगभरात करोनासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. आर्टिकमधील बर्फ वितळल्यानंतर त्यातून झॉम्बी विषाणू पसरु शकतात. त्यामुळे जगभरात वैद्यकीय आणीबाणीची परिस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे.

आर्टिक पर्माफ्रॉस्ट वितळल्यानं झॉम्बी विषाणू पसरण्याची शक्यता आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागावर किंवा त्याखाली असलेल्या स्थायी थराला पर्माफ्रॉस्ट म्हणतात. हा थर माती, लहान दगड आणि रेतीपासून तयार झालेला असतो. बर्फामुळे तो एकत्रित राहतो. तापमान वाढीमुळे बर्फ वितळू लागला आहे. त्यामुळे विषाणू पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. विषाणूमुळे असलेला धोका समजून घेण्यासाठी शास्त्रज्ञांनी गेल्या वर्षी सायबेरियातील पर्माफ्रॉस्टमधून काही नमुने गोळा केले. आर्टिक परिसरात असलेले विषाणू हजारो वर्षांपासून गोठलेल्या अवस्थेत आहेत. बर्फ वितळल्यास हे विषाणू जगभरात पसरू शकतो.

ऐक्स मार्सिले विद्यापीठाचे अनुवंशशास्त्रज्ञ जीन-मिशेल क्लेवरी यांनी संशोधकांकडून होणाऱ्या एका चुकीकडे लक्ष वेधलं. आधी दक्षिणेत फैलाव होणाऱ्या आणि मग तिथून उत्तरेला पसरणाऱ्या महामारींच्या विश्लेषणाकडे सध्या अनेक जण लक्ष देत आहेत. त्यामुळे उत्तरेकडून दक्षिणेला पसरु शकणाऱ्या विषाणूंवर फारसं संशोधन होत नाही. ही मोठी चूक आहे. उत्तरेत असे विषाणू आहेत, ज्यामुळे नवी महामारी निर्माण होऊ शकते, असा धोक्याचा इशारा त्यांनी दिला.

सायबेरियाच्या विविध भागांमध्ये सापडलेल्या विषाणूंमुळे महामारीचा फैलाव होऊ शकतो. या भागातील सापडलेला विषाणूचा एक नमुना ४८५०० वर्षे जुना आहे. 'आम्ही जे विषाणू शोधले ते केवळ अमिबाला संक्रमित करण्यास सक्षम होते. त्यामुळे माणसांना कोणताही धोका नव्हता. पण याचा अर्थ पर्माफ्रॉस्टमध्ये गोठलेल्या अवस्थेत असलेले सगळेच विषाणू तसेच असतील असं नाही. उत्तर गोलार्धाचा २० टक्के भाग पर्माफ्रॉस्टनं झाकलेला आहे. या भागात एक प्राचीन जीवांच्या अवशेषांसह विषाणू आहेत. हा भाग एखाद्या टाईम कॅप्सूलसारखा आहे' असं क्लेवरी म्हणाले.

Post a Comment

0 Comments