Ticker

6/recent/ticker-posts

6 चेंडूत 6 षटकार मारुन या खेळाडूने इतिहास घडवला, फक्त ६४ चेंडूत केल्या इतक्या धावा

वामशी कृष्णाने 6 चेंडू मध्ये 6 षटकार मारुन इतिहास घडवला, फक्त ६४ चेंडूत केल्या इतक्या धावा


एका षटकात सहा षटकार मारण्याचा पराक्रम

आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून ते देशांतर्गत आणि स्थानिक क्रिकेटमध्ये अनेकदा पहायला मिळाला. एका ओव्हरमध्ये सहा षटकार मारण्याचा विक्रम अगदी मोजक्या फलंदाजांना करता आलाय. अशाच मोजक्या फलंदाजांमध्ये आंध्र प्रदेशच्या वामशी कृष्णाने स्थान मिळवले आहे.

आंध्र प्रदेशकडून खेळणाऱ्या कृष्णाने दमनदीप सिंहच्या ओव्हरमध्ये ६ षटकार मारून ३६ धावा वसूल केल्या. या सामन्यात वामशी कृष्णाने वादळी फलंदाजी करत फक्त ६४ चेंडूत ११० धावांची खेळी केली. दमनदीप सिंहसाठी ही ओव्हर एका वाईट स्वप्नासारखी ठरली. कृष्णाने सर्व षटकार ऑन-साइडच्या दिशने मारले.

वामशी कृष्णाने पहिल्या चेंडूवर स्लॉग स्वीप शॉट खेळला. त्याने चेंडू आउटसाइट ऑफकडून डीप मिड विकेटच्या दिशने मारला. त्यानंतर लॉग ऑनच्या दिशने दुसरा, तिसरा चेंडू दमनदीपने फुल लेंथ टाकाल ज्यावर कृष्णाने डीम मिड विकेटच्या वरून षटकार मारला. चौथ्या चेंडूवर स्लॉग स्वीप शॉट खेळून, पाचव्या चेंडूवर डीप स्क्वेअर लेगच्या दिशने तर अखेरच्या चेंडूवर बॅकफुटला जात सहावा षटकार पूर्ण केला.

एका षटकात सहा षटकार कसे मारले पहा. 


सीके नायडू ट्रॉफीमध्ये कडप्पा येथे रेल्वेविरुद्ध खेळताना वामशी कृष्णाने एका ओव्हरमध्ये ६ चेंडूवर ६ षटकार मारले. भारतीय फलंदाजांमध्ये अशी कामगिरी करणारा तो फक्त चौथा फलंदाज आहे. याआधी रवी शास्त्रींनी १९८५ साली, युवराज सिंगने २००७ साली आणि ऋतुराज गायकवाडने २०२२ मध्ये एका ओव्हरमध्ये ६ षटकार मारण्याची कामगिरी केली होती.

वामशी कृष्णाने 6 चेंडू मध्ये 6 षटकार मारलेला video पहा. Click Here

https://twitter.com/BCCIdomestic/status/1760262831402799228?t=wdXcYF6NfreiR6-gPHBCQw&s=19


Post a Comment

0 Comments