Ticker

6/recent/ticker-posts

लोकसभा निवडणूक 2024 - शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवडणूक (BLO) ड्युटीतून वगळण्याचे आदेश

लोकसभा निवडणूका-२०2४ च्या कामाकरिता तसेच मतदार याद्यांच्या अद्यावती करणासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचारी वर्गासंदर्भात आदेश, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवडणूक (BLO) ड्युटीतून वगळण्यात यावे. 

मतदार यादीत नाव आहे की नाही ते चेक करा. - Click Here

पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक संपूर्ण माहिती वाचा. - Click Here


संदर्भः १. महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचे दि. २०.०२.२०२४ चे पत्र.

२. श्री. कपिल हरिश्चंद्र पाटील, सदस्य, महाराष्ट्र विधानपरिषद यांचे दि.२१.०२.२०२४ चे पत्र


Join WhatsApp Group

https://chat.whatsapp.com/EpsLJMm0NF10E9JmtMjobQ



महोदय, उपरोक्त संदर्भाधीन पत्राच्या प्रती सोबत जोडल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या दि.२०.०२.२०२४ च्या पत्रान्वये शालेय विद्यार्थाचे शैक्षणित नुकसान होऊ नये यासाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आगामी लोकसभा/विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकरिता ०५ दिवसांपेक्षा अधिक काळ जुंपण्यात येऊ नये, अशी मागणी केली आहे. त्याचप्रमाणे श्री. कपिल पाटील, विपस, यांनी १०वी व १२वी च्या परीक्षा तोंडावर असल्याने शिक्षकांना BLO कर्तव्यातुन तातडीने मुक्त करण्याची विनंती केली आहे.

या अनुषंगाने आपले लक्ष भारत निवडणूक आयोगाच्या दि.०४.१०.२०२२ च्या पत्राकडे वेधण्यात येत आहे (प्रत सोबत जोडली आहे). त्यानुसार मतदार याद्या तयार करणे व त्यांच्या पुनरिक्षणाच्या कामासाठी नियुक्ती करावयाच्या मतदान केंद्रस्तरिय अधिकाऱ्यांच्या (BLO) नियुक्त्या करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केलेले आहे. त्यानुसार सदर पत्रातील परि.१.२ मध्ये १३ प्रकारच्या प्रवर्गातील शासकीय/निम शासकीय कर्मचाऱ्यांची मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून नियुक्ती करता येते. त्याच प्रमाणे सदर १३ प्रवर्गातून आवश्यकतेनुसार कर्मचारी उपलब्ध झाल्यास त्याच पत्रातील परि.१.३ मध्ये नमूद ०४ प्रवर्गातील कर्मचारी सुध्दा BLO म्हणून घेता येतात. त्या मध्ये केंद्र शासनाचे कर्मचारी, गट-ब अधिकारी, इच्छूक असलेले सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी यांचा समावेश आहे.

मतदार याद्यांच्या पुनरिक्षणाच्या कामासाठी शिक्षकांच्या नियुक्तीच्या अनुषंगाने भानिआने दि.०५.०९.२०१६ च्या पत्रान्वये काही सूचना निर्गमित केलेल्या आहेत. या सूचना सर्व जिल्हाधिकारी यांना यापूर्वीच पाठविण्यात आलेल्या आहेत. सदर पत्राची प्रत सुलभ संदर्भासाठी सोबत जोडली आहे. त्यानुसार सेंट मेरि स्कूल व इतर या न्यायालयीन प्रकरणात मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार शैक्षणिक कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांना (teaching staff) केवळ रजेच्या दिवशी, शैक्षणिक काम नसलेल्या दिवशी (non-teaching days) तसेच शैक्षणिक काम नसलेल्या वेळेत (non-teaching hours) मतदार यादीच्या पुनरिक्षणाचे काम देता येईल.

त्याचप्रमाणे मा. उच्च न्यायालयाने रिट याचिका क्र. ३३५/२०१३ (S.P. R. J. Kanya Shala Trust Vs. ECI) या न्यायालयीन प्रकरणात लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, १९५० च्या कलम २९ व लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, १९५१ च्या कलम १५९ अन्वये उपलब्ध करुन द्यावयाच्या कर्मचारी वर्गा संदर्भात निर्णय दिलेला आहे. त्यापैकी कलम २९ मतदार याद्या तयार करण्याच्या अनुषंगाने कर्मचारी वर्ग उपलब्ध करुन असून कलम १५९ सदर कलम प्रत्यक्ष निवडणूकीच्या कामासाठी कर्मचारी वर्ग उपलब्ध करुन देण्यासंदर्भातील आहे. त्यानुसार खाजगी अनुदानित/विना अनुदानित शाळांतील (Private uided/non-aided Schools) शैक्षणिक तसेच अशैक्षणिक कर्मचारी वर्ग प्रत्यक्ष निवडणूकीच्या कालावधीत ०३ दिवस प्रशिक्षणाकरिता व ०२ दिवस मतदानाच्या दिवसाकरिता उपलब्ध करुन देण्याबाबतची तरतूद आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच श्री. कपिल हरिश्चंद्र पाटील, विपस यांच्या पत्रातील आशय विचारात घेता फेब्रुवारी ते एप्रिल हा कालावधी शैक्षणिक दृष्ट्या महत्वाचा कालावधी आहे. याच कालावधीमध्ये विविध शाळांच्या परिक्षा घेण्यात येत असतात. त्यामुळे सरसकट शिक्षक वर्गाला निवडणूक कर्तव्यार्थ तसेच मतदार यादीच्या कामासाठी कायमस्वरूपी काम देणे हे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणारे ठरू शकते ही त्यांची भावना रास्त स्वरुपाची वाटते. मात्र, निवडणूकीचे कामही महत्वाचे व तातडीचे असल्याने तसेच लोकप्रतिनिधित्व अधिनियमातील विवक्षित तरतूदी नुसार या प्रयोजनार्थ संबंधित स्थानिक प्राधिकारी संस्थेने तसेच शासनाने आवश्यक तो कर्मचारी उपलब्ध करुन देणे अनिवार्य आहे. मात्र, सदर कर्मचारी वर्ग उपलब्ध करुन देत असताना शिक्षकांव्यतिरिक्त भानिआच्या दि.०४.१०.२०२२ च्या पत्रात नमूद केलेल्या अन्य प्रवर्गातील कर्मचारी वर्ग सुध्दा उपलब्ध करुन देता येईल.

सबब, वरील सर्व बाबींचा विचार करता तसेच मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अनुषंगाने भानिआने दिलेले आदेश विचारात घेऊन मा. आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका व जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, मुंबई शहर व मुंबई उपनगर यांनी या संदर्भात तातडीने एकत्रित बैठक घेऊन शिक्षकांना वगळून अन्य कर्मचारी वर्ग अधिगृहित करण्याबाबतच्या सर्व शक्यता तपासून तातडीने उपाययोजना करावी/निर्णय घ्यावा. त्यामध्ये इच्छुक सेवानिवृत्त शासकीय कर्मचाऱ्यांना BLO ची ड्युटी देण्याबाबत सुध्दा पर्याय वापरण्यात यावा. त्याचप्रमाणे शैक्षणिक कर्तव्यार्थ असलेल्या कोणत्याही कर्मचाऱ्यास निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्ती दिल्यास शैक्षणिक दिवशी (teaching days) व शैक्षणिक वेळी (teaching hours) निवडणूकीचे काम दिले जाणार नाही, याबाबतही दक्षता घेण्यात यावी.

(श्रीकांत देशपांडे) 

(अपर मुख्य सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी) 


शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवडणूक (BLO) ड्युटीतून वगळणेबाबतचा आदेश डाउनलोड करा. - Download Link

Post a Comment

0 Comments