आज मौजे. अंतरवाली सराटी येथे महाराष्ट्रातून आलेल्या मराठा बांधवांसोबत झालेल्या बैठकीत मनोज जरांगे पाटलांकडून मोठी घोषणा, सगे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी व्हावी यासाठी नवे आंदोलन | असे असेल आंदोलन व मागण्या.
आज मौजे. अंतरवाली सराटी येथे महाराष्ट्रातून आलेल्या मराठा बांधवांसोबत झालेल्या बैठकीत खालील निर्णय घेण्यात आले.
निर्णय नंबर ०१ - येत्या दोन दिवसात जर सगेसोयरे अधिनियम लागू नाही केला तर गावागावात बेमुदत आदर्श रस्ता रोको सकाळी १०:३० ते दुपारी ०१ पर्यंत.
निर्णय नंबर ०२ - राजकीय नेते त्यात आमदार खासदार मंत्र्यांनी दारात यायचं नाही आणि गाडी घेऊन आमच्या शेताच्या समोरुन सुद्धा जायचं नाही.
निर्णय नंबर ०३ - आदर्श आचारसंहिता पालन आम्हाला करता यावी यासाठी मराठा आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका पुढे ढकलाव्या, जर घेतल्याचं तर त्यांना प्रेमाने सांगा गावात प्रचाराला येऊ नका जर आलेच प्रचाराला तर प्रचाराला आलेल्या गाड्या कोठ्यात लावल्या जातील याची नोंद घ्यावी.
निर्णय नंबर ०४ - २९ फेब्रुवारी नंतर अती वयस्कर लोकांनी सराटी येथे आमरण उपोषणाला बसावे.
निर्णय नंबर ०५ - कुणी राजकीय लोकांनी दमदाटी केली तर जशास तसे उत्तर मराठा जातीने मिळून द्यावे.
निर्णय नंबर ०६ - ०३ मार्चला महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचा एकच रस्ता रोको.
निर्णय नंबर ०७ - सर्व मराठा सरपंच ते नगरसेवक ते पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य, सर्व पक्षाचे तालुका अध्यक्ष तथा राजकीय पक्षातील सर्व राजकीय व्यक्ती - आरक्षणाची मागणी होईपर्यंत कुणीही पक्षाकडे जाऊ नका म्हणजे जातीच्या विरोधात जाऊ नका, जर नाही ऐकल तर त्यांच्या आयुष्यात त्यांच्या मदतीला आम्ही मराठे येणार नाहीत.
0 Comments