Ticker

6/recent/ticker-posts

दिव्यास्त्र : अग्नि-५ क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी, चीन, अर्धा युरोप आला टप्प्यात

दिव्यास्त्र : अग्नि-५ अण्वस्त्रे तसेच विविध प्रकारची स्फोटके वाहून नेण्यासाठी सक्षम असणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वीरीत्या घेण्यात आली आहे. यामुळे चीन, अर्धा युरोप आला टप्प्यात आला आहे. डीआरडीओचे हे मोठे यश आहे याबद्दल पंतप्रधानांनी शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे. 



स्वदेशी बनावटीच्या अग्नि-५ क्षेपणास्त्राची पहिली चाचणी यशस्वीरीत्या पार पडली. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डीआरडीओ शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. अग्नि-५ अण्वस्त्रे तसेच विविध प्रकारची स्फोटके वाहून नेण्यासाठी सक्षम आहे. दिव्यास्त्र या मोहिमेच्या अंतर्गत हे क्षेपणास्त्र विकसित करण्यात आले आहे. दिव्यास्त्र मोहिमेची प्रकल्प संचालक एक महिला शास्त्रज्ञ असून अग्नि-५ क्षेपणास्त्र विकसित करण्यात महिलांचा मोठा वाटा आहे.

मोदी यांनी म्हटले आहे की, एमआयआरव्ही या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने स्वदेशी बनावटीचे अग्नि-५ विकसित करण्यात डीआरडीओच्या शास्त्रज्ञांना यश मिळाले आहे.


अग्नी 5 क्षेपणास्त्र विषयी माहिती

अग्नी 5 हे मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल री-एंट्री व्हेईकल (MIRV) तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. म्हणजेच ते एकाच वेळी अनेक लक्ष्यांवर लॉन्च केले जाऊ शकते. संपूर्ण चीन आणि अर्धा युरोप या क्षेपणास्त्राच्या कक्षेत आहे. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता 5 हजार किलोमीटर आहे. ते दीड टन वजनाची अण्वस्त्रे वाहून नेऊ शकते. त्याचा वेग मॅक 24 आहे, म्हणजे ध्वनीच्या वेगापेक्षा 24 पट जास्त. अग्नि-५ क्षेपणास्त्र ५ हजार किमीपर्यंतच्या लक्ष्याचा अचूक वेध घेऊ शकते. 

भारताशिवाय जगात आतापर्यंत फक्त 5 देश आहेत ज्यांच्याकडे MIRV तंत्रज्ञानाने सुसज्ज क्षेपणास्त्रे आहेत. यामध्ये चीन, अमेरिका, रशिया, ब्रिटन आणि फ्रान्सचा समावेश आहे. 7 मार्च रोजी भारताने क्षेपणास्त्र चाचणीसाठी नोटीस टू एअर मिशन (NOTAM) जारी केले होते. क्षेपणास्त्र चाचणीची माहिती आसपासच्या देशांना देणे हा त्याचा उद्देश आहे.


महिला शास्त्रज्ञ संचालक

अग्नि-५ या क्षेपणास्त्राची अण्वस्त्रे व विविध प्रकारची स्फोटके वाहून नेण्याची व त्यांचा अनेक ठिकाणी मारा करण्याची क्षमता आहे. सूत्रांनी सांगितले की, एक महिला शास्त्रज्ञ दिव्यास्त्र या मोहिमेची संचालक आहे. मात्र त्यांच्या नावाचा तपशील जाहीर करण्यात आलेला नाही. अग्नि-५ हे क्षेपणास्त्र स्वदेशी बनावटीच्या एव्हिऑनिक्स तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. लक्ष्याचा अचूक वेध घेण्यासाठी या क्षेपणास्त्रात सेन्सर यंत्रणेचा वापर केलेला आहे.


अग्नि-५चा माऱ्याचा पल्ला ५ हजार किमीपर्यंतचा 

अग्नि-५ क्षेपणास्त्र ५ हजार किमीपर्यंतच्या लक्ष्याचा अचूक वेध घेऊ शकते. अशा प्रकारचे क्षेपणास्त्र भारताकडे असणे आवश्यक होते. या क्षेपणास्त्राच्या मायाच्या टप्प्यात आशिया खंडातील सर्व देश तसेच चीनचा उत्तरेकडील भाग, युरोपचा काही भाग येतो. अग्नि १ ते ४ ही क्षेपणास्त्रे ७०० किमी ते ३५०० किमीपर्यंत मारा करू शकतात. भारत अतिशय प्रगत क्षेपणास्त्रे विकसित करत असून त्यासाठी प्राधान्याने स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. 

भारताने सोमवारी अग्नी-5 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आणि आंतरखंडीय क्षेपणास्त्र (ICBM) असलेल्या आघाडीच्या देशांच्या यादीत आपला समावेश केला. हे क्षेपणास्त्र मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल री-एंट्री व्हेईकल (MIRV) तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. देशाच्या या यशाचे वर्णन पाश्चिमात्य माध्यमांनी चीन आणि पाकिस्तानला इशारा म्हणून केले आहे.


भारताच्या 'अग्नि-5'मुळे चीनच्या पोटात जळजळ !

भारताच्या स्वदेशी बनावटीच्या अग्नी-5 क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीने चीनच्या पोटात जळजळ झाल्याचे दिसत आहे. चीन मान्य करत नसला तरी हे भारताचे मोठे यश असल्याचे त्यांनाही माहिती आहे. म्हणून चीनकडून या परीक्षणानंतर प्रतिक्रिया आली आहे. कोणत्याही देशाला किंवा त्यांच्याकडे असलेल्या शस्त्रांना आपण घाबरत नसल्याचेही चीनकडून आपणहून सांगण्यात आले आहे. चीनच्या चिडचिडीचा अंदाज त्याच्या अलीकडच्या विधानावरून लावता येतो, ज्यात अरुणाचल प्रदेशाबाबतही त्यांनी बेताल वक्तव्ये केली होती.

Agni 5 missile actual range - 8000km
Agni 5 missile
Agni 5 missile photo
Agni 5 missile velocity
Agni 5 nuclear missile
Agni 5 missile speed
Agni 5 missile test
Agni 5 missile upsc

Post a Comment

0 Comments