Ticker

6/recent/ticker-posts

संत गाडगे बाबा स्वच्छ भारत कौशल्य प्रबोधिनीचे उद्घाटन

ठाणे | कोपरी येथे महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास विद्यापीठ संचालित संत गाडगे बाबा स्वच्छ भारत कौशल्य प्रबोधिनीचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज झाले. यावेळी महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NSDC) यांच्यामध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण व रोजगारासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण करार करण्यात आला. 



राज्यातील युवकांना ७५ हजार शासकीय नोकऱ्या द्यायचा निर्णय या शासनाने घेतला होता, मात्र प्रत्यक्षात एक लाख ६० हजार शासकीय नोकऱ्या आतापर्यंत देण्यात आल्या आहेत. या शासनाने नोकरभरतीवरील बंदी उठविली. कौशल्य विकास विभागाने अतिशय उल्लेखनीय काम करून दाखविले असून या विभागाकडून आतापर्यंत १ लाख नोकऱ्या दिल्या गेल्या असून १ लाख जणांना स्वयंरोजगार  दिला आहे.  ‘बीव्हीजी’ चे हनुमंतराव गायकवाड यांनी पुढील दहा वर्षात दहा लाख नोकऱ्या देण्याचे नियोजन केले असून आज लोकार्पण  केलेले देशातील पहिले स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्या विकास प्रबोधिनी आणि संत गाडगेबाबा स्वच्छ भारत कौशल्य प्रबोधिनी मोलाची भूमिका बजावणार आहे, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.



विविध सामाजिक संस्थांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी बेरोजगारांची यादी बनवावी व ही यादी अशा संस्थांकडे द्यावी असे आवाहन करुन या बेरोजगार तरुण-तरुणींना कौशल्य विकास प्रशिक्षणानंतर त्यांना तीस हजार ते दीड लाख रुपयांपर्यंत पगार मिळणार आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या माध्यमातून अनेकांनी आपले स्वयंरोजगार सुरू केले असल्याचेही  मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले. 

 

पालकमंत्री शंभूराज देसाई, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, माजी आमदार रविंद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के, कौशल्य विकास आयुक्त श्रीमती निधी चौधरी, कुलगुरु अपूर्वा पालकर, बी.व्ही.जीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हणमंतराव गायकवाड, नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NSDC) चे अजय रैना आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments