Ticker

6/recent/ticker-posts

मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुक लढवावी असं भाजप नेत्याच वक्तव्य

मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुक लढवावी असं भाजप नेत्याच वक्तव्य

राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे, मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मोठा लढा उभारला. मात्र आता दुसरीकडे त्यांना लोकसभा निवडणूक लढवण्याची देखील ऑफर मिळाली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवावी, त्यांना आपण पाठिंबा देऊ असं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं  मनोज जरांगे पाटील यांनी निवडणूक लढवावी. 


दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. जालना लोकसभा मतदारसंघातून जरी मनोज जरांगे पाटील हे उभे राहिले तरी भाजपचे नेते रावसाहेब दानवेच पुन्हा निवडून येतील, असं कराड यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, रावसाहेब दानवे हे जालना लोकसभा मतदारसंघातून सलग पाच वेळा निवडून आले आहेत. मतदार संघात त्यांची प्रचंड लोकप्रियता आहे. त्यामुळे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे उमेदवार असले तरीही रावसाहेब दानवे यांचा विजय पक्का आहे. रावसाहेब दानवे हे जरांगेंना घाबरणार नाहीत असं कराड यांनी म्हटलं

Post a Comment

0 Comments