Ticker

6/recent/ticker-posts

लोकसभा निवडणूक 2024 - निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांचा अचानक राजीनामा

लोकसभा निवडणूक 2024 : Election Commission : लोकसभा निवडणूक 2024 ला अवघा एक आठवडा राहिला आहे. एक आठवडाआधी निवडणूक आयोगातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी राजीनामा दिला आहे.

 

लोकसभा निवडणुकीच्या एक आठवडाआधी निवडणूक आयोगातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी राजीनामा दिला आहे. राष्ट्रपतींनी अरुण गोयल यांचा राजीनामा स्वीकारला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा पुढच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. गोयल यांच्या राजीनाम्यामुळे तारखांच्या घोषणांमध्ये बदल होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

भारतीय निवडणूक आयोगात एक पद आधीच खाली होतं, त्यातच अरुण गोयल यांनी राजीनामा दिल्यामुळे आता फक्त मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचं पदच शिल्लक आहे. 


अरुण गोयल यांच्या विषयी

अरुण गोयल यांनी त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ शिल्लक असताना राजीनामा दिला आहे. निवडणूक आयुक्तांचं एक पद आधीच खाली होतं. याआधी निवडणूक आयुक्त अनूप पांडे यावर्षी फेब्रुवारी महिन्यात रिटायर झाले होते. गोयल यांनी 21 नोव्हेंबर 2022 ला भारतीय निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला होता.

अरुण गोयल 1985 सालचे पंजाब कॅडरचे आयएएस अधिकारी होते. 37 वर्षांपेक्षा जास्त काळ गोयल भारत सरकारच्या अवजड उद्योग मंत्रालयाचे सचिव म्हणून काम करून निवृत्त झाले होते.

Post a Comment

0 Comments