Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे ची क्रीडा अधिकारी पदी नियुक्ती | कष्टाचं झालं चीज

डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेच्या कष्टाचं चीज, 'या' पदावर शासकीय नोकरीमध्ये निवड



डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याच्या कष्टाचं चीझ झालेलं आहे. पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरमधील राक्षेवाडीचा पैलवानासाठी आनंदाची बातमी आहे. बलदंड शरीरयष्टी असलेल्या शिवराज राक्षे याला शासकीय नोकरी मिळाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांना पत्र देण्यात आलं. एकदा नाहीतर दोनवेळा महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकणारा शिवराज आता क्रीडा अधिकारी म्हणून काम करणार आहे. क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करणाऱ्यांच्या पाठीशी सरकार भक्कम असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवलं.

शिवराज याने महेंद्र गायकवाड याला पराभूत करत पहिल्यांदा महाराष्ट्र केसरीचं मैदान मारलं होतं. त्यानंतर धाराशिव येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत त्याने आपला मित्र असलेल्या हर्षवर्धन सगीर याला चीतपट करत डबल महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवला होता. क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करणाऱ्यांच्या पाठीशी सरकार भक्कम असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवलं. 

शिवराज याने महेंद्र गायकवाड याला पराभूत करत पहिल्यांदा महाराष्ट्र केसरीचं मैदान मारलं होतं. त्यानंतर धाराशिव येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत त्याने आपला मित्र असलेल्या हर्षवर्धन सगीर याला चीतपट करत डबल महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवला होता.

Post a Comment

0 Comments