Ticker

6/recent/ticker-posts

टीईटी परीक्षा 2024 होणार ऑफलाइन - डॉ. नंदकुमार बेडसे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद

टीईटी परीक्षा 2024 होणार ऑफलाइन, राज्य परीक्षा परिषदेची तयारी सुरू आहे. याबाबत डॉ. नंदकुमार बेडसे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांनी माहिती दिली आहे. 



महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) चे यंदा प्रथमच ऑनलाइन माध्यमातून घेण्याचे नियोजित केले होते. मात्र, तांत्रिक तसेच माध्यमनिहाय परीक्षा घेताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता यंदाची टीईटी परीक्षा ऑफलाइन घेण्याचे ठरविले आहे. यास राज्य शासनाने परवानगी दिली असून, त्या दृष्टीने परीक्षा परिषदेतर्फे नियोजन केले आहे. राज्य परीक्षा परिषदेने टीईटी परीक्षा ऑनलाइन घेण्याची तयारी सुरू केली होती. मात्र, इंग्रजी, मराठी, उर्दू अशा माध्यमांमध्ये परीक्षा घेणे अडचणी ठरत असल्याचे समोर आले. त्यामुळे टीईटी ऑफलाइन आयोजित करावी, अशी राज्य शासनाकडे विनंती केली.


संख्येत होणार घट?

राज्यात नोव्हेंबर २०२१ मध्ये ४ लाख ६८ हजार ६७९ उमेदवारांनी टीईटी परीक्षा दिली होती. त्यामध्ये १७ हजार ३२४ म्हणजेच ३.७० टक्के उमेदवार उत्तीर्ण झाले होते. उमेदवारांना सध्या सीटीईटी परीक्षेचा पर्याय उपलब्ध झाला आहे. डी.टीएड पदविकेस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत काही वर्षात लक्षणीय घट झाली आहे.


टीईटी परीक्षेचे ऑफलाइन पध्दतीने आयोजन केले जाईल. परिषदेतर्फे कार्यशाळा घेण्यात येणार आहे. प्रश्नपत्रिका तयार करणे, परीक्षेशी संबंधित निविदा देणे आदी प्रक्रिया पूर्ण केल्या जातील.
डॉ. नंदकुमार बेडसे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद

Post a Comment

0 Comments