जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकात आशा क्लिनिक, शाळांना सोलरसह, अमृत रसोई व अपंगांसाठी ई-रिक्षा या नव्या योजना जाहीर केल्या आहेत. त्यासाठी अनुक्रमे २४ लाख, दोन कोटी ५० लाख व ४९ लाखांची तरतूद केली आहे. तसेच ग्रामीण भागातील मुली, मागास व अपंग विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी ५० लाखांची तरतूद केली आहे. मॉडेल आरोग्य केंद्र, मॉडेल अंगणवाडी, खडूमुक्त अभियान, सायन्स वॉल यासाठीची तरतूद केल्याने आरोग्य व शिक्षणासाठीच्या पायाभूत, अत्याधुनिक सुविधांसह आर्थिक बाबीवर भर दिला आहे.
यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी सन २०२४-२५ या वर्षाचे ४८ कोटी ११ लाखांचे अंदाजपत्रक सादर केले. सन २०२३-२४ चे मूळ अंदाजपत्रक ४५०६, ६८ लाख होते. त्यात यंदाच्या अंदाजपत्रकात ३०४.९९ लाखांची वाढ करण्यात आली. पाच कोटी ३४ लाखांची शिल्लक आहे.
स्पर्धा परीक्षेत पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या मुलींसाठी १५, मागास विद्यार्थ्यांसाठी १५, अपंगांसाठी २० लाख अशी ५० लाखांची तरतूद केली आहे. शाळांना क्रीडा साहित्य पुरविण्यात १० लाखांची वाढ करून २० लाख, खडूमुक्त शाळा, सायन्स वॉलसह शैक्षणिक साहित्यासाठी ७५ लाख, बाकड्यांसाठी २० लाख, अपंगांना ई रिक्षासाठी ४९ लाखांची तरतूद केली आहे. शिष्यवृत्ती शुल्क भरणे, विद्यार्थ्यांसाठीची सायकल बैंक योजनाही सुरू राहणार आहे.
जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकावर एक नजरआशा यांच्या आरोग्यासाठी आशा क्लिनिक ही योजना.
- प्राथमिक आरोग्य केंद्र / उपकेंद्राकडील जैव घनकचरा व्यवस्थापन.
- मागासवर्गीय विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत.
- इ.५ वी ते ९ वी च्या मागासवर्गीय मुलामुलींना सायकली पुरविणे.
- अपंग व्यक्तींना स्वयंचलित सहायभूत साधने व ई-रिक्षा देण्यात येणार.
- जिल्हा परिषदेच्या शाळेत खडूमुक्त शाळा, व्हाइट बोर्ड व सायन्स वॉल उपक्रम राबविणार.
- जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वीज बचत होण्यासाठी सोलर युनिट बसविणे.
शिक्षण विभागाच्या योजना
💡 उर्जा योजना : जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या उमेदवारांना पूर्वपरीक्षा पास झाल्यानंतर मुख्य परीक्षेच्या तयारी साठी अर्थसहाय्य...
तरतूद : ५० लाख
मागासवर्गीय विद्यार्थी, दिव्यांग आणि मुली
💡अमृत रसोई : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये आदर्श किचन तयार करणे आणि प्रशस्त डायनिंग हॉल तयार करणे.
तरतूद : २.५ कोटी
💡 खडू मुक्त शाळा व सायन्स वॉल : जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळांमध्ये व्हाईट बोर्ड बसविणे आणि प्रत्येक शाळेत वैज्ञानिकांची जयंती साजरी करण्यासाठी सायन्स वॉल तयार करणे.
तरतूद : ७५ लाख
💡 विद्यार्थ्यांसाठी बेंच सुविधा : जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी बेंच बसवून देणे.
तरतूद : २० लाख
💡सोलर युनिट : जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वीज बचत होण्यासाठी सोलर युनिट बसविणे.
💡मॉडेल अंगणवाडी- आनंदवाडी : जिल्ह्यातील अंगणवाड्यांना मॉडेल अंगणवाडी बनविण्यासाठी विविध शैक्षणिक साहित्य पुरविणे.
तरतूद : ८० लाख
0 Comments