Ticker

6/recent/ticker-posts

भावना गवळी यांची नाराजी दूर, मोदींना पंतप्रधान करण्यासाठी करणार प्रयत्न

यवतमाळ वाशिम मतदारसंघात विद्यमान खासदार भावना गवळी यांना उमेदवारी न देता तिथे महायुतीकडून राजश्री पाटील यांना रिंगणात उतरवण्यात आलं. त्यामुळे नाराज झालेल्या भावना गवळी या प्रचारापासून दूर होत्या. मात्र आता त्यांची नाराजी दूर झाली असून त्यांनी आपली प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांना दिली आहे. भावना गवळी यांची नाराजी दूर, मोदींना पंतप्रधान करण्यासाठी करणार प्रयत्न



मी नाराज होणाऱ्यांपैकी नाही. परंतु उमेदवारी न मिळाल्यानं मला खंत वाटली. खंत वाटल्याने मी बाहेर पडली नाही. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमच्या पक्षाचे सर्वेसर्वा आहेत. त्यांनी ज्याप्रकारे राज्यात काम केले आहे. पोटतिडकीने ते रात्रंदिवस काम करतायेत. त्यात अबकी बार ४०० पार या यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेला साद देत मी महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचाराचं काम करणार आहे असं विधान यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळी यांनी केले आहे. त्यामुळे भावना गवळी यांची नाराजी दूर करण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना यश आल्याचं दिसून येते.

भावना गवळी म्हणाल्या की, मित्रपक्ष आणि घटक पक्षासोबत आमची आजपासून बैठक, मेळावे सुरू होतील. राजश्री पाटील यांना विजयी करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. मी २५ वर्षापासून काम करते, शिवसेना जिल्हाप्रमुख, खासदार म्हणून काम केलेय. माझे वडील शिवसेनेत होते. लहानपणापासून बाळकडू मिळाले आहे. मला काय भेटतंय यासाठी मी काम करत नाही. माझे लक्ष पदावर नव्हते. जनतेने माझ्यावर विश्वास टाकला आहे त्याला तडा जाणार नाही यासाठी मी काम करत आहे. माझ्यासाठी शिवसेना पक्ष महत्त्वाचा आहे असं त्यांनी म्हटलं.

तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत चर्चा चांगली झाली. पुढच्या काळात कसा प्रचार करायचा, कशा जबाबदाऱ्या घ्यायच्या त्यावर चर्चा झालीय. राजश्री पाटील यांना निवडून आणण्याची जबाबदारी माझ्यावर दिली आहे. ज्यारितीने माझा प्रचार मी करत होते, तसेच महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. जे काही झाले ते भूतकाळ आहे. माझ्यासाठी शिवसेना पक्ष महत्त्वाचा असून मी कधी प्रसिद्धीच्या भानगडीत पडले नाही. सातत्याने माझ्या मताधिक्यात वाढ होत आलीय. पक्षासाठी मी बांधील आहे असं भावना गवळी यांनी सांगितले.

दरम्यान, मी संघर्षातून पुढे आलीय, त्यामुळे नाराज होत नाही. आपण कुठे कमी पडलो याचे आत्मचिंतन करणारी मी आहे. त्याचसोबत मी लढणार आहे आणि महायुतीच्या उमेदवाराच्या विजयासाठी लढणार आहे. २५ वर्ष मी कुटुंब म्हणून मतदारसंघात काम केले आहे. जुने ऋणानुबंध जुळले जातात. त्यामुळे मतदारांमध्ये काहीसी नाराजी वाटणे साहजिकच आहे. परंतु महायुतीच्या उमेदवाराला विजयी करणे यासाठी आम्ही कामाला लागलोय. माझ्या आयुष्यात नेहमी चढउतार पाहिले आहे असं भावना गवळी यांनी म्हटलं.


कोण आहेत भावना गवळी

भावना गवळी यांचा न्म 23 मे 1974 रोजी झाला. त्या यवतमाळ-वाशीम लोकसभेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शिवसेनेच्या पाच वेळा खासदार आहेत आणि त्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार पुंडलिकराव गवळी यांच्या कन्या आहेत त्या खासदार म्हणून कार्यरत आहेत. या मतदारसंघासाठी 1999 पासून त्या सध्या महाराष्ट्रातील सर्वात ज्येष्ठ खासदार आहेत (25 वर्षांहून अधिक कार्यकाळात). 


यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ हा पश्चिम भारतातील महाराष्ट्र राज्यातील ४८ लोकसभा (भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह) मतदारसंघांपैकी एक आहे . हा मतदारसंघ 19 फेब्रुवारी 2008 रोजी 12 जुलै 2002 रोजी स्थापन करण्यात आलेल्या भारतीय सीमांकन आयोगाच्या शिफारशींवर आधारित राष्ट्रपती अधिसूचनेच्या अंमलबजावणीचा एक भाग म्हणून तयार करण्यात आला होता. २००९ मध्ये त्याची पहिली निवडणूक झाली जी जिंकली शिवसेनेच्या भावना गवळी यांनीच. 


Post a Comment

0 Comments