Ticker

6/recent/ticker-posts

Maha TET Exam 2024 Registration link, syllabus, exam fee, schedule | महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 नोंदणी, आवश्यक पात्रता, फी, अभ्यासक्रम

Maha TET Exam 2024 | महा टीईटी परीक्षा 2024 महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 ही 10 नोव्हेंबर 2024 रोजी घेण्यात येणार आहे. 



CTET Exam 2024 Registration Link - Click Here

केंद्रीय शिक्षक भरती प्रवेश परीक्षा नोंदणी लिंक - Click Here



1) online test series for TET MARATHI join now for free

2) MAHA TET Exam unit wise Videos for all subjects and guess Question Video. 

3) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा MAHA TET बाबत संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी येथे टच करा


महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे ४ या कार्यालयावर शासनाने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२४ (MAHATET २०२४) घेण्याची जबाबदारी सोपविलेली असून ही परीक्षा दिनांक-१०/११/२०२४ रोजी घेण्याचे निश्चित केलेले आहे.


इ. १ली ते ५वी व इ.६ वी ते इ.८वी साठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित/विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. या परीक्षेशी संबंधित सर्व शासननिर्णय, अनुषंगिक माहिती, सुचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, 

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे, परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहितीचा तपशील परिषदेच्या उपरोक्त वेबसाईट वर देण्यात आला आहे. सर्व संबंधितांनी संकेतस्थळास नियमित भेट द्यावी. सदर  TET परीक्षेची ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया दिनांक - ०९/०९/२०२४ पासून सुरु होत असून दिनांक येतील, संबंधितांनी याची नोंद घ्यावी, ही विनंती.


महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 नियोजन

Maha TET Exam 2024 Schedule


१. ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी

०९/०९/२०२४ ते ३०/०९/२०२४


२. प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे

२८/१०/२०२४ ते १०/११/२०२४ 


३. शिक्षक पात्रता परीक्षा पेपर। दिनांक व वेळ

दि.१०/११/२०२४ वेळ १०.३० AM ते १३,०० PM


४. शिक्षक पात्रता परीक्षा पेपर ।। दिनांक व वेळ

दि.१०/११/२०२४ वेळ १४.०० PM ते १६.३० PM


Maha TET Exam 2024 Notification Click Here


महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा ऑनलाईन अर्ज 

Maha TET Exam 2024 Application link

Maha TET Exam Registration link - Click Here



१. परीक्षाविषयक सर्व जसे आवेदनपत्र भरणे, परीक्षा शुल्क, शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता, अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका, मुल्यमापन व निकाल विषयक सविस्तर माहिती व शासननिर्णय परिषदेच्या वेबसाईट https://mahatet.in वर उपलब्ध आहे. त्यातील प्रत्येक सुचना काळजीपूर्वक तपासूनच अर्ज भरावा. 

२. अर्ज भरताना परीक्षार्थीनी इ.१० वी, इ.१२वी शैक्षणिक / व्यावसायिक अर्हता, दिव्यांगत्व, राखीव प्रवर्गाचे असल्यास जात इत्यादि बाबतची माहिती मुळ प्रमाणपत्रावरुनच भरावी. स्कॅन केलेला नवीन रंगीत फोटो, स्कॅन केलेली स्वाक्षरी, स्वयंघोषणा पत्र व स्वतःचे ओळखपत्र ऑनलाईन आवेदनपत्रात अपलोड करावयाची असल्याने सोबत ठेवावी. 

३. सदर परीक्षेत प्रविष्ठ होऊ इच्छिणान्या उमेदवारांशी संपर्क Email, SMS सुविधा याद्वारे होऊ शकतो. त्यामुळे उमेदवारांनी स्वतःचा ई-मेल आयडी व भ्रमणध्वनी क्रमांक अचूक द्यावा व जतन करुन ठेवावा, पेपर I (प्राथमिक स्तर) व पेपर ॥ (उच्च प्राथमिक स्तर) दोन्ही प्रश्नपत्रिकेसाठी प्रविष्ठ होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दोन्ही स्तरासाठी (प्राथमिक स्तर व उच्च प्राथमिक स्तर) असा विकल्प निवडावा, जेणेकरुन परीक्षा बैठक व्यवस्था एकाच विकाणी करता येईल, प्रत्येक स्तरासाठी स्वतंत्र अर्ज भरण्याची आवश्यकता नाही

४. सदर जाहिरातीनुसार उमेदवारांना केवळ Online अर्ज करता येईल. ऑफलाईन आलेले अर्ज स्विकारले जाणार नाही याची उमेदवारांनी गांभिर्याने नोंद घ्यावी, 

५. परीक्षेचे शुल्क ऑनलाईन, बैंकिंग, क्रेडिट/डेबिट कार्ड इ. द्वारे ऑनलाईन पद्धतीने भरावे लागेल. (चलनाद्वारे ऑनलाईन शुल्क भरता येणार नाही) परीक्षा शुल्क भरणा यशस्वी झाल्यानंतर आवेदनपत्रातील माहिती अंतिम करण्यात येईल, नंतर आवेदनपत्रामध्ये कोणत्याही स्वरुपाची दुरुस्ती करता येणार नाही व त्याबाबतचे निवेदन स्वीकारले जाणार नाही. अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत परीक्षा शुल्क ऑनलाईनरित्या स्वीकारले जाईल, विविध पद्धतीने अर्ज सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय सदर अर्ज विचारात घेतला जाणार नाही. 

६. ऑनलाईन आवेदनपत्रासोबत कोणात्याही कागदपत्रांच्या प्रती जोडण्याची आवश्यकता नाही. तसेच, आवेदनपत्र / कागदपत्रे (प्रमाणपत्रे) गटशिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी यांच्याकडे जमा करण्याची आवश्यकता नाही.

७. मुळ प्रमाणपत्राच्या पडताळणीस अधीन राहून उमेदवारांना परीक्षेस तात्पुरता प्रवेश दिला जाईल व निकाल घोषित केला जाईल. परीक्षेच्या निकालानंतर शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्रांची पडताळणी प्रमाणपत्र वितरणाच्या वेळी करण्यात देईल, प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी कागदपत्रे अपूर्ण असल्यास अथवा उमेदवार प्रमाणपत्रे सादर करू न शकल्यास या परीक्षेची उमेदवारी रद्द करण्यात येईल, ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये भरलेल्या माहितील व मूळ कागदपत्रामध्ये तफावत आढळून आल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल.


Maha tet 2024
TET Exam 2024
Maha tet exam 2024
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा
शिक्षक पात्रता परीक्षा
केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा

Post a Comment

0 Comments